परभणी, दि.10 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ०८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समजाच्या घटकाकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक २०२० / प्र.क्र. २३ /अजाक/दिनांक ९ डिसेंबर २०२०, दिनांक १६ मार्च २०२० व शासन निर्णय दिनांक २६ मार्च २०२ ९ अन्वये शासन स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सदरचे शासन निर्णय शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी परभणी जिल्ह्यातील सदर योजनेकरिता इच्छुक नवउद्योजक लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या अटीची व शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-