परभणी, दि.10 (जिमाका) : परभणी शहरातील अनेक आस्थापनांनी बिगर मराठी भाषेत फलक लावण्यात आले आहे. परभणी शहरातील सर्व संबंधित आस्थापनांनी बॉम्बे शॉप अॅक्ट नुसार आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन निर्गमित केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील आस्थापनांवर असलेला दर्शनी फलक हा मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. तरी परभणी जिल्हयातील सर्व आस्थापनांनी आपल्या आस्थापनेचे दर्शनी भागातील फलक हे मराठी भाषेत लावावेत. तसेच 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याबाबतही परभणी शहरातील सर्व आस्थापनांना शासन निर्णय व परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी वि.नं.माणगांवकर, यांनी केले आहे. -*-*-*-*-