परभणी, दि.10 (जिमाका) : खेलो इंडिया अंतर्गत टेबल टेनिस या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण केंद्र मान्य झाले आहे. त्या अनुषंगाने नविन खेळाडूंकरीता टेबल टेनिस या खेळाच्या प्रशिक्षणासाठी 8 ते 12 वर्षाच्या आतील मुला-मुलींची निवड चाचणीसाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे दि.12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे. निवड चाचणीसाठी येताना आधारकार्ड व वयाचा पुरावा या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तरी नोंदणीसाठी जिल्हयातील शाळा, क्रीडा शिक्षक , क्रीडा मंडळे, जिल्हा संघटना यांना अवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खेळाडुंनी या चाचणीसाठी आपल्या शाळा, क्रीडा शिक्षक, क्रीडा मंडळे, संघटना यांच्यामार्फत सहभाग नोंदवावा. सहभागासाठी संपर्क पवन कदम – 8379028584, प्रकाश पंडित – 8788525374 यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी dsopbn99@gmail.com या ई-मेलवर करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-