परभणी, दि.12 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे व अनुसूचित जातीच्या अनुदानित आश्रमशाळा या योजनेचे सॉफ्टवेअर विकसीत करणे या दोन योजनाकरीता सॉफटवेअर बनविण्याचे दरपत्रक दिनांक १३ डिसेंबर २०२१ पासुन सिलबंद लिफाफ्यामध्ये दि. 13 जानेवारी 2022 दुपारी ४.०० वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण परभणी यांनी केले आहे. यावेळेनंतर प्राप्त दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. दरपत्रकातील दर स्विकारणे, नाकारणे अथवा रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय यांनी राखुन ठेवले आहेत. दिलेल्या दरपत्रकात जे दर आहे त्याच दराने सेवा पुरवठादारांना करावे लागेल त्याचे वर्षभर वाढ किंवा बदल होणार नाही, अनुभवी सेवापुरवठाधारकांना प्राधान्य देण्यात येईल. दुकान नोंदणी प्रमाणपत्र पॅन कार्ड नोंदणी प्रमाणपत्र सत्यप्रत, GST नोंदणीबाबतचा तपशिल, संगणक कंपनीचा अधिकृत विक्रेता असल्याबाबतचे व सेवासुविधा पुरविण्यास पात्र असल्याबाबतचे कंपनीचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे तसेच सॉफ्टवेअर विकसीत केल्यापासुन एक वर्षापर्यंतचा देखभाल खर्च हा पुरवठादारास करावा लागेल. तरी इच्छुकांनी आपले दरपत्रक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्याकडे वेळेत सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय, परभणी यांनी केले. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News