परभणी, दि.12 (जिमाका) : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तीक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे,शेळी-मेंढी गट वाटप करणे,1000 मासंल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे.ज्या लाभाथ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे(प्रतीक्षा यादीवरील लाभार्थ्यांसह),अशा लाभार्थ्यांनी दि.12 जानेवारी 2022 (सकाळी 10.00 पासून) ते दि.16 जानेवारी 2022 (रात्री 12.00 वा.पर्यंत) या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या https//ah.mahabms.com संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी यांनी केले आहे. निवड झालेल्या (प्रतीक्षा यादीवरील लाभार्थ्यांसह) लाभार्थ्यांनी दि.16 जानेवारी 2022 रात्री 12.00 वा.पर्यंत या विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड कराण्याची संबित लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-