परभणी, दि.12 (जिमाका) : चाटोरी व माळेगाव येथील यात्रेकरिता परराज्याचा महाराष्टृ राज्यात प्रतीबंदीत असलेला ,महाराष्टृ राज्याचा कर चुकवुन गोवा राज्याची विदेशी दारु बेकायदेशीररित्या परभणी जिल्हयात विक्रीच्या उददेशाने अंबाजोगाई येथुन मरडसगाव चाटोरी मार्गे काही अज्ञात इसम एका पांढ-या रंगाच्या स्विट चारचाकी वाहनाने रात्रीच्या 12.00 नंतर पहाटे वाहतुक करणार असल्याची खात्रीलायक बातमीवरुन मा. ,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ,परभणी रविकिरण कोले, निरीक्षक सुशील अ. चव्हाण ,सर्व दुय्यम निरीक्षक बि.एस. मंडलवार ,ए.जे.सय्य्द,एस.आर.अल्हाट ,तसेच वाहनचालक बालाजी कच्छवे यांनी दि.8 जानेवारी 2022 रोजी रात्री 3 नंतर मरडसगाव-चाटोरी रोडवर ,मौजे चाटोरी शिवार ,ता.पालम,जि.परभणी येथे सापळा रचुन छापा टाकला असता आरोपी नामे रंगना्थ शंकर काळे ,गजानन पुरभाजी कांबळे व शेख समिर शेख जलिल हे चारचाकी वाहन स्विफ्ट डिझायर कार जीचा क्र.एम.एच.12 एच. झेड 3661 ने मडसगाव कडून चाटोरीकडे येताना दिसुन आली असता विभागाच्या सापळा रचलेल्या अधिकारी कर्मचारी योनी सदर वाहनास थांबवुन, घेराव घालून झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतीबंदीत असलेली ,महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन गोवा राज्यातुन बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी दारू मॅकडोल नं.1 व्हिस्की 180 मिली क्षमतेचे एकुण 10 कागदी खोके यात प्रत्येक खोक्यात 48-48 प्रमाणे एकूण 480 सिलबंद बाटल्या ,विदेशी दारू इंप्रीयल ब्ल्यु व्हिस्की 180 मिली क्षमतेचे एकूण 5 कागदी खेाके यात प्रत्येक खोक्यात 48-48 प्रमाणे एकूण 240 सिलबंद बाटल्या तसेच याच बॅन्डचे बनावट लेबल मिळून आल्या याची किंमत रूपये 4,31,550/-अशी आहे.आरोपी रंगनाथ शंकर काळे ,गजानन पुरभाजी कांबळे व शेख समिर शेख जलिल यांना अटक करण्यात आली असून सदर आरोपी पैकी दोन आरोपी अंबाजोगाई ,जि. बीड तसेच एक आरोपी मरडसगाव ,ता. गंगाखेड ,जि.परभणी येथील रहिवाशी आहे, गुन्हा निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ,परभणी कार्यालयात नोंदविण्यात आला असुन ,आरोपीने सदर बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा कोठून आणला व कोणास वितरीत करणार होते याचा पुढील तपास निरीक्षक सुशील अ. चव्हाण हे करीत आहेत मद्य खरेदी फक्त राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जारी केलेल्या परवान्यातुनच घेण्यात यावी तसेच परभणी जिल्हयात अवैद्य मद्य ,बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगुन असेल किंवा विक्री करीत असेल तर याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्यात यावी. या विभागाचा फोन नं. 02452-220373 वर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-