परभणी, दि.17 (जिमाका) :- जिल्ह्यातील महाराष्ट्र मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा असल्याने दि.21 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती तसेच फिटनेस अपॉईंटमेंटच्या तारखा री-शेड्युल्ड करण्यात आल्या असून नवीन तारखा 24, 25, 27, 28 आणि 31 जानेवारी 2022 अशा राहतील. उमेदवारांना मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. तरी अर्जदारांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अपॉईंटमेंटच्या दिवशी चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे. -*-*-*-*-