परभणी, दि.17 (जिमाका) :- परभणी जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी वर्ष 2022 करीता तीन स्थानिक सुट्या अधिसुचनेनूसार जाहीर केल्या आहेत. यामध्ये बुधवार दि.2 फेब्रुवारी 2022 रोजी ऊर्स दर्गाह सयद तुराबुल हक्क, मंगळवार दि.14 जून रोजी वटपौर्णिमा आणि मंगळवार दि.29 नोव्हेंबर रोजी खंडोबा यात्रा (चंपाषष्टी) या दिवशी परभणी जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयासह इतर शैक्षणिक संस्था यांना स्थानिक सुट्टी लागू राहील. ही अधिसुचना परभणी जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालये आणि बँकांना लागू होणार नाही. असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कळविले आहे. -*-*-*-*-