महारोजगार मेळाव्याचे 26 जानेवारीपासून आयोजन
· स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रम
नांदेड (जिमाका) दि. 18 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हृयातील नियोक्तांनी सहभाग नोंदवा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमाकांशी किंवा nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
000000