परभणी, दि.19 (जिमाका) :- केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षात दिलेल्या मंजुरीनुसार मुरघास निर्मिती करीता “सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य” या योजनेची परभणी जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेअंतर्गत प्रती मुरघास निर्मिती युनिट करीता 10 लाख रुपये (50 टक्के केंद्र हिस्सा) निधी असुन उर्वरीत 50 टक्के रु.10.00 लक्ष संस्थेने स्वत: खर्च करायचे आहेत. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादन संघ/संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी, स्वयं सहाय्यता बचतगट व गोशाळा/पांजरपोळ संस्था यांना द्यावयाचा आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील 2 संस्थांना योजनेचा लाभ चालु वर्षी देण्यात येणार आहे. योजनेच्या अर्जाचा नमुना, मार्गदर्शक सुचना व बंधपत्र तालुकास्तरावर उपलब्ध असुन इच्छुक संस्थांनी संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती मधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे दि.4 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेपुर्वी स्वयंपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन डॉ.पी.पी.नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-