परभणी, दि.19 (जिमाका) :- जिल्ह्यातील सहा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सतत मागील कमीत कमी तीन वर्षांपासून ऊसतोड कामगार म्हणून काम करत असलेल्या व परभणी जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळखपत्र देण्याची कार्यवाही संबंधित गावातील, वस्त्यांमधील पाड्यांमधील संबंधित ग्रामसेवकामार्फत करण्यात येत आहे . त्याकरीता पात्र असलेल्या ऊसतोड कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह आधारकार्ड , पासपोर्ट आकाराचा फोटो, राशनकार्ड, बँक पासबुक आदीसह आपल्या गावातील ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती गीता गुठ्ठे, सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे . -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News