परभणी, दि.20 (जिमाका) :- जिल्ह्यातील महाराष्ट्र मोटार वाहन विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा असल्याने फिटनेस अपॉईंटमेंटच्या तारखा री-शेड्युल्ड करण्यात आल्या आहेत. पुर्वीच्या तारखा 21, 22 व 24 जानेवारी या होत्या तर आता नवीन तारखा 27, 28 आणि 31 जानेवारी 2022 अशा राहतील. तरी अर्जदारांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अपॉईंटमेंटच्या दिवशी संबंधित मोटार वाहन निरीक्षकांशी संपर्क साधून वाहनांच्या उपलब्धतेनूसार आपली वाहने चाचणीसाठी मौजे असोला येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर हजर करुन सहकार्य करावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे. -*-*-*-*-