ठिबक, तुषार सिंचनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हयात ऊस, केळी, हळद पिकास ठिबक सिंचनाचा व सोयाबीन, हरभरा पिकास तुषार सिंचनाचा वापर करून मोठया प्रमाणात क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) या बाबीसाठी लाभ देण्यात येतो. यापुर्वी या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी यांस 55 टक्के व इतर शेतकरी यांना 45 टक्के खर्च मर्यादेच्या अनुदान देण्यात येत होते. सन 2021-22 मध्ये केंद्र शासनाने खर्चाच्या मापदंडामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनुदानाच्या रक्कमेतही वाढ झाली आहे. सन 2021-22 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना देय 55 टक्के अनुदानास पुरक अनुदान 25 टक्के व इतर शेतकऱ्यांना (5 हेक्टरच्या मर्यादेत) देय 45 टक्के अनुदानास पुरक अनुदान 30 टक्के देय आहे. याप्रमाणे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना 80 टक्के व इतर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान मिळणार आहे. 

या योजनेअंतर्गत यापूर्वी व सध्या 1 हेक्टरसाठी मिळणारा लाभ पुढीलप्रमाणे आहे. ठिबक सिंचन (1 हेक्टर साठी) लॅटरल अंतर (मी.) 1.2X0.6, पुर्वीची खर्च मर्यादा 1 लाख 12 हजार 237 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 61,730 रुपये तर 45 टक्के 50 हजार 507 रुपये आहे. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 1 लाख 27 हजार 501 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदानात 80 टक्के 1 लाख 2 हजार 1 रुपये तर 75 टक्के 95 हजार 626 रुपये आहे. तसेच लॅटरल अंतर (मी.) 1.5X1.5, पुर्वीची खर्च मर्यादा 85 हजार 603 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 47 हजार 82 रुपये तर 45 टक्के 38 हजार 521 रुपये. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 97 हजार 245 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 77 हजार 796 रुपये आणि 75 टक्के मध्ये 72 हजार 934 रुपये आहे. लॅटरल अंतर (मी.) 5X5, पुर्वीची खर्च मर्यादा 34 हजार 664 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 19 हजार 65 रुपये, 45 टक्केत 15 हजार 599 रुपये आहे. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा 39 हजार 378 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 31 हजार 502 रुपये तर 75 टक्केत 29 हजार 533 रुपये आहे. याशिवाय पिकांच्या वेगवेगळया अंतरानुसार अनुदान देय आहे.


तुषार सिंचन क्षेत्र
 1 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा (75 एमएम) 21 हजार 901 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्केत 12 हजार 45 रुपये तर 45 टक्केत 9 हजार 855 रुपये. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75 एमएम) 24 हजार 194 रुपये. सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्केत 19 हजार 355 रुपये तर 75 टक्केमध्ये 18 हजार 145 रुपये अनुदान देय राहील. तसेच तुषार सिंचन क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत पुर्वीची खर्च मर्यादा 31 हजार 372 रुपये, यापुर्वी देय अनुदान 55 टक्के 17 हजार 254 रुपये, 45 टक्केत 14 हजार 117. सन 2021-22 मधील खर्च मर्यादा (75mm) 34 हजार 657 रुपये व सन 2021-22 मधील देय अनुदान 80 टक्के 27 हजार 725 रुपये तर 75 टक्केमध्ये 25 हजार 992 रुपये अनुदान देय राहील, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

000000