परभणी, दि.19 (जिमाका) :- सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनातर्फे परभणी जिल्ह्यात धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित व निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे . त्यानुषंगाने परभणी जिल्हयातील इच्छुक भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमांच्या नामांकित व निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता कार्यालयाद्वारे दि. 23/10/2021 व 24/10/2021 रोजीच्या स्थानिक वृतपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात आलेले होते. सदरचे अर्ज दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजी र्यंत ( सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत ) प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण परभणी यांचे नावे डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , कारेगाव रोड , परभणी समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत . असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे. सद्यस्थितीला शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्याच्या पालकांच्या सोयीनुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कार्यक्षेत्रात प्रवेश देण्यास या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आलेली आहे. योजनेच्या अटी व शर्ती १ ) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. २ ) विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. ३ ) विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न मर्यादा रु. १ लाख इतकी असावी. ४ ) सन २०२१-२२ या वर्षात विद्यार्थी १ ली ते ५ वी इयत्तामध्ये प्रवेशित असावा. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित व निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता निवड झालेल्या शाळांची यादी खालीलप्रमाणे असून सदर शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल . शाळेचे नाव जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोनपेठ जि.परभणी , हायटेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , एरंडेश्वर ( झीरो फाटा ) ता. पूर्णा जि.परभणी या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News