परभणी, दि.21 (जिमाका):- जिल्हयातील ताडी दुकानांचा जाहीर लिलाव सन 2021 -2022 या वर्षासाठी ई- लिलाव ई निविदा पध्दतीने दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी ठेवण्यात आलेला आहे. तरी इच्छुक बोलीदारानी ताडी लिलावात सहभागी होण्यासाठी http://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. तरी ई- लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी. असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले यांनी केले आहे. -*-*-*-*-