घोडज येथील कामेश्वर या बालकाशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद 

नांदेड (जिमाका) दि. 23 :– प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 साठी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांची निवड झालेली आहे. भारतातील निवड झालेल्या राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांची आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. कामेश्वरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांचा एक प्रकारे गौरव झाला असून याबद्दल कामेश्वरचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

000000