वृत्त क्र. : 43 दि. 24 जानेवारी, 2022 भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात फेसबुक लाईव्हद्वारे सहभागी होण्याचे आवाहन परभणी, दि.24 : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभाचा मुख्य ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम हा दि. 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 09.15 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडीयम, परभणी येथे राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार आहे. सद्यस्थीतीत परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परभणी जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी न होता या जिल्ह्याचे फेसबुक Live link https://www.facebook.com/collector.pbn फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे. -*-*-*-*-*-