वृत्त क्र. : 42 दि. 24 जानेवारी, 2022 पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम परभणी, दि.24 :- राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि.25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 04.00 वाजता परभणी येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी परभणी जिल्हा शहर कार्यकारणीची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी सायंकाळी 5.00 वाजता महानगरपालिका परभणी नगरसेवकांची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी सायंकाळी 06 ते 08 दरम्यान राखीव व सोईनुसार मुक्काम करतील. बुधवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आगमन व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त जिल्हा कृषी अधिकारी व इतर सबंधीत अधिकाऱ्यासमवेत जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांसदर्भात आढावा बैठक स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी. सकाळी 10.30 वाजता दैनिक धर्मयोध्दा या दैनिकाच्या प्रथमअंक प्रकाशन सोहळयास उपस्थिती स्थळ बी. रघुनाथ सभागृह, वसमत रोड, परभणी. सकाळी 11.00 वाजता श्री. विजय गव्हाणे माजी आमदार यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी. दुपारी 12.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परभणी ग्रामीण कार्यकारीणीची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी दुपारी 1 ते 3.30 दरम्यान राखीव. दुपारी 3.30 वाजता परभणी येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-