परभणी, दि.25 (जिमाका) :- बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दि. 25 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय मतदार दिवस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी करत राष्ट्रीय मतदार दिनाबद्दल माहिती देवून मतदार दिनाचे महत्व सांगितले . त्यानंतर राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ श्रीमती आंचल गोयल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्वांना दिली. त्यानंतर प्रथमच नाव नोंदणी केलेल्या नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप तसेच तृतीयपंथी यांच्या नावाची प्रथमच नोंदणी झालेल्या 5 तृतीयपंथी मतदारांचा सत्कार आणि मतदार नोंदणीसाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत निवडणूक विभागासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गीत गायन करणाऱ्या कलावंतांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सत्कार केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व व मतदानाचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागातील उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, नायब तहसिलदार श्रीमती वंदना मस्के, नानासाहेब भेंडेकर, लक्ष्मीकांत खळीकर तर महसूल सहाय्यक प्रविण कोकांडे, विकास कुटे, दिवाकर जगताप यांच्यासह जिल्हा निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मोजक्या मतदारांची उपस्थिती होती. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News