परभणी, दि.27 (जिमाका) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग परभणी कार्यालयाच्यावतीने विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी लघु पाटबंधारे विभाग जायकवाडी परिसर या विभागीय कार्यालयात स्वातंत्र्यापुर्वीची सिंचन परिस्थिती व स्वातंत्र्यानंतरची सिंचन परिस्थिती या विषयाबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे कार्यक्रम पार पडला. तसेच ढालेगाव उच्च पातळी बंधारा येथेही याच कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकऱ्यांना व स्थानिकांना स्वातंत्र्यापुर्वीची सिंचन परिस्थिती व स्वातंत्र्यानंतरची सिंचन परिस्थितीबद्दल अवगत करुन जानजागृती करण्यात आली. असे कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-