परभणी, दि.28 (जिमाका) :- नोंदणीकृत मदरशाच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना मंत्रीमंडळाच्या मान्यतेनुसार शासन निर्णय क्र. अविवि2010/प्र.क्र.152/10का-6,दि.11/10/2013अन्वये सदर योजनेअंतर्गत पात्र मदरसा यांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर योजना सन 2021-22 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसा यांच्याकडुन प्राप्त प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत दि.11/10/2013 च्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र मदरशाची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तरी मदरशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि. 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News