30 जानेवारी रोजी हुतात्मा दिन   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मा प्रती आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळुन हुतात्मा दिन पाळला जाणार आहे. यासंदर्भात शासनाच्या परिपत्रकानुसार सकाळी 10.59 मिनिटापासून 11 वाजेपार्यंत इशारा भोगा वाजविण्यात येईल. यानंतर सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय,अस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, यातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळावी. ज्या ठिकाणी भोग्याची  व्यवस्था नसेल त्या ठिकाणी संबंधितांनी सकाळी ठिक 11 वाजता मौन पाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

000000