परभणी, दि. 1 (जिमाका) :-अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वस्तीगृह जिंतुर या वसतिगृहात एकूण 100 मुलींना शासन निर्णयानुसार मुस्लीम-35,बौध्द-21,ख्रिश्चन -06,जैन -06,पारसी -01,शिख -01,बिगर अल्पसंख्याक मुलींना -30 प्रवेश द्यावयाचा आहे. तसेच अल्पसंख्याक मुलींना 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणा-या मुलींना भोजन भत्ता म्हणून प्रति महा 3000/-रूपये मिळणार आहे. तरी पात्र व गरजुनी प्रवेशासाठी अर्ज करावेत. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-