परभणी, दि.3 (जिमाका) :- राज्यातील गरिब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात दि.1 जानेवारी 2020 पासून शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 25 शिवभोजन केंद्र कार्यान्वित असून एकुण 21 शिवभोजन केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित 4 केंद्रावर तात्काळ दोन दिवसात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याबाबत प्रशासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कार्यरत एकुण 25 शिवभोजन केंद्रावर प्रतिदिन एकुण 2 हजार 675 थाळ्याचे वाटप केले जात आहे. शिवभोजन केंद्रावर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याकरीता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-