लहान येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी…!

दोन गटातील ६२ जणांवर गुन्हे दाखल.

अर्धापूर ( शेख जुबेर )

अर्धापूर: तालुक्यातील लहान येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्री दोन गटातील तरूण युवकांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे ६२ जणांवर गून्हे दाखल झाले आहेत. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून गावात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या गावात शांतता प्रस्थापित केली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लहान येथे भेट देऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना शांतेतेचे आवाहन केले आहे.

दोन गटातील ६२ जणांवर गुन्हे दाखल.

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन कुटुंबातील जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून फिर्यादी व त्यांचा मित्र अविनाश लोखंडे हे दूचाकिवरून बारडकडे जाता आसतांना आरोपींनी दुचाकी आडवून लाठी काठी, लोखंडी रॉडने मारहाण केली ‌‌‌‌‌‌‌‌तसेच फिर्यादीच्या खिशातील ४ हजार ७०० रूपये नगदी व बोटातील पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी व‌ मित्राच्या खिशातील ३ हजार रुपये रोख काढून घेतले. अशी फिर्याद गूरुप्रसाद शिवसांभ धारकर यांनी दिल्यावरुन २८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गावातील एका गटाने जुन्या भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी एकत्र जमून दलित वस्ती धुडगूस घालून येथील काही मुलाला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घरावर दगडफेक करून काचा फोडल्या ‌‌‌‌व चार हजारांचे नुकसान केले. आणि व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अर्जुन महादु सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यासह इतर गून्हे दाखल करण्यात आले आहेत.

गावात शांतता, पोलिस बंदोबस्त तैनात

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी लहान येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या गावात शांतता असुन येथील जनजीवन सुरळीत झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील ६२ जणांवर गून्हे दाखल केले असले तरी अजून कोणासही अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील हे करित आहेत.

अफवा पसरवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई- पोलीस प्रशासन

गावात सध्या शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातही शांतता समितीची बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले. तरी नागरिकांनी दोन समाजात किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पसरवू नये अन्यथा संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.