परभणी, दि.११(जिमाका) :- जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत गावांना 100 टक्के नळाद्वारे पाणीपुरवठा करणे हा शासनाचा उद्देश असून, ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली कामे दि.31 मार्च 2022 पुर्वी करण्यासाठी कामांना गती द्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज बैठकीत दिल्या. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीस यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, कार्यकारी अभियंता एस.डी.पवार यांच्यासह उपअभियंता, वरिष्ठ भुवैज्ञानिक व शाखा अभियंता आदींची उपस्थिती होती.