मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट)

प्रकल्पातंर्गत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत नांदेड जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्था कडून मूल्य साखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज शेतमाल, शेळ्या (मांस व दुध) व पसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) मूल्यसाखळी विकासाच्या उपक्रमासाठी आहेत. पात्र समुदाय आधारित संस्थानी https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर अर्ज करावे तसेच ऑफलाईन अर्ज  दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत खालील दिल्याप्रमाणे संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती  अभियानांतर्गंत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र यांचा समावेश आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत, अर्जाचा नमूना आदी  माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून  इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावर डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून द्यावी.  शेतकरी उत्पादक कंपनी यांनी  प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय तसेच लोकसंचलित साधन केद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाईलन अर्ज सादर करावेत. या अगोदर अर्ज केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असे आवाहन जिल्हा अंमलबजावणी  कक्ष (स्मार्ट) तथा संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

000000