परभणी, दि.21 (जिमाका) :- जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पध्दतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक दि.22 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे. तरी कामे घेण्यास इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांनी आवश्यक कागदपत्रासह बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन सदस्य सचिव, काम वाटप समिती नांदेड, तथा सहाय्यक अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी केले आहे.