परभणी, दि.21 (जिमाका) :- नामांकित निवासी इंग्रजी माध्यम शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप कळमनूरी जि.हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते दुसरीकरीता दि.10 मार्च 2022 पर्यंत प्रवेश अर्ज देण्यात येणार आहेत. तरी सदरचे अर्ज प्रकल्प कार्यालय कळमनूरी येथे उपलब्ध आहेत. तरी प्रवेशासाठी अर्ज करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-