परभणी, दि.21 (जिमाका) :- जायकवाडी पाटबंधारे विभागामार्फत सात दिवसाच्या आत आपापले पाणी परवानगीचे नुतनीकरण करुन घ्यावे अन्यथा नुतनीकरण न केल्यास पाटबंधारे विभागामार्फत जायकवाडी डाव्या कालव्यावरील अनाधिकृत विद्युत मोटारी जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. विभागाअंतर्गत मोठे प्रकल्पावरील मुख्य कालव्यावर असलेल्या उपसासिंचन योजना आणि उच्च पातळी बंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, अधिसुचित नदी नाले व मुख्य कालव्यावरील गावे कि.मी. 122 ते 208 मौजे देवेगाव, रेणाखळी, वरखेड, मानोली, खवणे पिंपरी, किन्हाळा खु, पाथर गव्हाण, देवनांद्रा, झरी, सिमुरगव्हाण, खडकवाडी, नारगजवळा, इटाळी, उक्कलगाव, रत्नापुर, पोहेटाकळी, भोसा, नागपूर, उमरी, बोरवंड खु, बोरवंड बु, पोहंडुळ, सुरपिंपरी, ठोंबरे पिंपळगाव, वडगाव, बाभूळगाव, मांडगाव, जंगमवाडी, नरसापुर, उजळंबा, लोहरा, सिंगणापूर यावरील उपसा सिंचनाच्या पाणी परवानगी देण्यात आलेल्या आहेत. असे कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.2 परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-