* परभणी, दि.24 (जिमाका) :- रशिया आणि युक्रेन या दोन देशातील सद्यस्थितीत युद्धाच्या परिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील जे प्रवासी नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आदी युक्रेनमध्ये वास्तव्यास आहेत. अशा नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी यापूर्वीच भारत सरकारमार्फत आवाहन करण्यात आले आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील ज्या नागरिकांना मायदेशी परत येता आले नाही अशा नागरिकांनी किंवा त्यांचे निकटवर्तीय नातेवाईकांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 02452-226400, टोल फ्री क्रमांक- 1077 तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भ्रमणध्वनी 7020825668 / 9975013726 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे. -*-*-*-*-