*

परभणी,दि.27 (जिमाका):- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा विविध ठिकाणी शुभारंभ होऊन सज्ज आरोग्य यंत्रणेमार्फत काल (ता.२७) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सोनपेठ येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलताई विटेकर यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार, तालुका संपर्क अधिकारी डॉ व्ही आर पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालय परभणी येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपली कन्या निश्वि सह लसीकरण सत्रास भेट देऊन मोहिमेचे औपचारिक उदघाटन केले याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त गीता गुट्टे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते,डॉ प्रकाश डाके,डॉ कालिदास चौधरी, डॉ बी टी धुतमल, डॉ कल्याण कदम,डॉ किशोर सुरवसे, डॉ रावजी सोनवणे, माधव जाधव, श्रीमती बुरकुले, श्रीमती भालेराव, श्रीमती दास ई उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पिंगळी येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी सभापती आनेराव यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधीताना योग्य त्या सूचना केल्या याप्रसंगी सरपंच सुरेश गरुड, उपसरपंच प्रशांत धाबाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते, लसीकरण अधिकारी डॉ रावजी सोनवणे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ गणेश सिरसुलवार, डॉ मोबीन, डॉ चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख कैलास सोमवंशी, तालुका पर्यवेक्षक शिंदे, आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते संध्या. ५ पर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिम स्वरुपात राबविण्यात आली, मात्र आजच्या दिवशी पोलिओ डोस पासून वंचित लाभार्थ्यांसाठी ता. १ ते ३ मार्च या काळात घरोघरी शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी सांगितले. -*-*-*-*-