अर्धापूर पोलिसांनी केली महाविद्यालय सुरक्षा व्यवस्थेची पाहणी …

अर्धापूर ( शेख जुबेर )

अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत नियमित सुरक्षा पाहणी अर्धापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.अशोक जाधव व पी.एस.आय. मोहम्मद तय्यब यांनी पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
महाविद्यालय सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत महाविद्यालयची सुरक्षा व्यवस्थेची पाहणी नियमित केली जाते. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेडचे सन्मानीय व्यवस्थापन मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेली महाविद्यालयची सुरक्षा प्रणाली व महाविद्यालयात राबवित असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव व पोलीस उपनिरीक्षक श्री तय्यब यांनी करून समाधान व्यक्त केले. तसेच महाविद्यलयातील नैसर्गिक वातावरण व पर्यावरण संवर्धनाच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. महाविद्यालय राबवत असलेल्या विविध समाज कल्याणकारी प्रकल्पाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. यावेळी सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीच्या समन्वयक प्रा.डाॅ.एस.पी.औरादकर, प्रा.डॉ. परमेश्वर पौळ, व प्रा.डॉ. काझी एम.के.देळुबकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.