स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरांवर तिरंगा ध्वज लावून स्वतंत्रदिन उत्साहात साजरा करा, तहसीलदार उज्वला पांगरकर

अर्धापूर ( शेख जुबेर ) यंदाचा स्वतंत्रदिन हा अमृत महोत्सवी. असून आपल्या घरांवर तिरंगा ध्वज लावून स्वतंत्रदिन उत्साहात साजरा करा असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी गुरुवारी (ता दहा) केले.शहरातील वार्ड क्रमांक आठ मध्ये नागरिकांना ध्वज वितरणाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.शहरातील विविध भागात ध्वज वितरण सुरू करण्यात आले असून नगरपंचयतीच्या वतीने रोपे देण्यात येत आहेत
शहरातील विविध भागात स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असून प्रभात फेऱ्या, शासकीय इमारतीवर रोषणाई आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शहराती प्रभाग क्रमांक आठ मधील पत्रकार लक्ष्मीकांत मुळें यांनी शंभर ध्वज दान देण्याचा संकल्प केला होता.त्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी तहसील उज्वला पांगरकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव, प्रवीण देशमुख डॉ विशाल ल़ंगडे व्यंकटी राऊत,उमेश सरोदे, ज्येष्ठ नागरिक चंपतराव राऊत, रामचंद्र गूंजकर, रामजी डक, रामजी गव्हाणे, तलाठी उज्वला वानखेडे,लक्ष्मण गाढवे, साईनाथ वटाने, ओमकार डक, नितीन गूंजकर, राजेश्वर मूळे आदी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी बलिदान दिले, सर्वस्वाचा त्याग केला, त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याची पाहाट पाहण्यास मिळाली आहे.. त्यांच्या त्यागाची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरांवर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी केले.तसेच योग्य ती काळजी घेऊनच तिरंगा लावावा असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.तसेच प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता १२) प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.या फेरीत विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी होणार आहेत.ही फेरी सकाळी आठ वाजता पोलिस ठाण्याच्या मैदानावरून निघून सांगता तहसील कार्यालयाच्या आवारात होणार आहे.‌
नगरपंचयतीच्या वतीने रोपे व नगरसेवकांच्या पुढाकाराने ध्वज दान देण्यात येत असून याची सुरुवात प्रभाग क्रमांक एक मधून झाली.यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, राजू शेटे,, बाळू माटे, उध्दव सरोदे, मदन कुमार डाके, हरीहर गवळी, कैलास देशमुख, आश्विन तमलवार आदी उपस्थित होते.