नांदेड : जनावरांमध्ये पसरत असलेला लम्पी या चर्मरोगाची झपाट्याने घातकता वाढत आहे. शेकडो जरावरे या रोगाने ग्रासली जात आहेत. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार व जनावरांची वाहतूक यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आदेश काढले आहेत.

नांदेडसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा रोग वेगाने

पसरणारा संसर्गजन्य आजार असल्याने जरावरे मोठ्या प्रमाणात वाधित आहेत. यामुळे शेतकरी हतवल झाले आहेत. लम्पी हा भयंकर रोग असून त्याची लागण मोठ्या झपाट्याने होते. यात अचानक ताप येणे, पशुधनाची अंगावर गाठी येणे, पशुधनाचे पाय आणि शरीर सुजणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. आजार संसर्गजन्य असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. दरम्यान या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार व जनावरांची वाहतुक यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढले आहेत.