नांदेड : नावघाट पुलाजवळील वसरणी चौक आणि दुधडेअरी चौकात भरधाव वेगातील दोन कार दुभाजकावर धडकून अपघात झाला. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावघाट पुल ते वसरणी मार्ग मोठा झाल्याने वाहतुक वाढली आहे. अनेक वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, यातूनच आता अपघात होत आहेत. रविवारच्या रात्री भरधाव वेगातील दोन वेगवेगळ्या कार दुभाजकावर धडकून अपघात झाला.

नावघाट, वसरणी चौकाजवळील अपघातात कार क्र. एमएच २६ वीसी ०९४९ या कारने धडक दिली. तर दुसऱ्या घटनेत दुधडेअरी चौकात महामार्गावर पुलाचे काम सुरु आहे, तेथे भरधाव वेगातील कार दुभाजकावर धडकली.

या दोन्ही घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले तर कारचे मोठे नुकसान झाले. सदर घटनेवावत ग्रामीण ठाण्यात अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवांड यांनी सांगितले.