नांदेड: शहरात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिम्नॅस्टिक क्लासला आलेल्या एका १५ वर्षीय मुलीला कपडे वदलताना पाहून तिच्याशी जवळीकता साधणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून, त्याला तीन दिवसाच्या पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंदिगड विद्यापीठातील विद्यार्थिनीचे खासगी व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा संबंध देशभर झाली.
यात जवळपास आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकरण ताजे असतानाच नदिडमध्येही संतापजनक प्रकार उघडकीस आला. शहराच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी शाळेजवळ जिम्मेस्टिक असोसिएशन क्लास, जयपाल रेड्डी (वय ४०) हा क्रीडा प्रशिक्षक चालवितो.