परभणी, दि.21 (जिमाका) :- मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध व्हाट्सअप ग्रुपवर आणि सोशल मीडियावर परभणी येथील पोलीस मुख्यालयात विविध पदांसाठी खुली सैन्य भरती होणार असल्याची बनावट जाहिरात व्हायरल होताना दिसून येत आहे. या जाहिरातीत उमेदवाराची शारीरिक व शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच भरतीच्या ठिकाणासह विविध जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या तारखा आणि लागणारी कागदपत्रे आदी नमूद करण्यात आलेले आहे. तरी अशा कुठल्याही प्रकारची सैन्य भरती सध्या परभणी जिल्ह्यात होणार नसून ही जाहिरात पुर्णतः खोटी असल्याने पात्र उमेदवारांनी अफवांपासून सावध रहावे. असे स्पष्टीकरण परभणीचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिले आहे. -*-*-*-*-