परभणी, दि. 8 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार प्रमोद वाकोडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. -*-*-*-*-