परभणी, दि. 1 (जिमाका) :- महाराष्ट्रात ओमिक्रॉनमुळे कोरोना कोव्हीड -19 विषाणूचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून दि . 25 डिसेंबर 2021 रोजी लागू केलेल्या आदेशात सुधारणा करून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आंचल गोयल यांनी जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. (1)बंदिस्त जागेत किंवा मोकळ्या जागेत होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल. (2 )बंदीस्त किंवा मोकळया जागेत होणारे कोणतेही मेळावे किंवा कार्यक्रम , मग ते सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक असो बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेच्या ठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. ( 3)अंतिम संस्कारांच्या बाबतीत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये पुढील कठोर कारवाई करण्यात केली जाईल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. -*-*-*-*-