परभणी, दि.25 (जिमाका) :- परभणी येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ” नदी उत्सव ” निमित्त सायकल रॅलीचे आयोजन स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने नदी उत्सव कार्यक्रमात अंतर्गत जनजागृती करण्यासाठी दोन ठिकाणी शालेय विद्यार्थ्याच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पहीली रॅली ही सकाळी 8 वाजता तुराबुल हक दर्गा ते शारदा विद्यालयापर्यंत घेण्यात आली. या रॅलीची सुरुवात हजरत तुराबुल हक दर्गा येथून उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली तर या रॅलीमध्ये जवळपास 125 मुला- मुलींनी सहभाग नोंदवला. या रॅलीचा समारोप शारदा विद्यालय येथे मुख्याध्यापक आर . के . चव्हाण ( कै . रावसाहेब जामकर विदयालय ) , एन . एस . जैस्वाल ( मुख्याध्यापक , शारदा विदयालय ) माणीक लाड , कुंडलीक रेंगे यांच्या हस्ते मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले. 100 मुलां – मुलींची दुसरी रॅली सकाळी 9 वाजता माता हिंगुल अंबिका मंदिर ते व . ना . म . कृ . विदयापीठ गेट पर्यंत घेण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात माता हिंगुल अंबिका मंदिर येथून उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली तर समारोप गांधी विदयालय , एकता नगर येथे झाला यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, उपशिक्षाधिकारी विठठल भुसारे , बी . एस . बालटकर मुख्याध्यापक गांधी विद्यालय , संजय मुढे , क्रीडा मार्गदर्शक, यांच्या हस्ते मुलानां बिस्कीट वाटप करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पी . आर . जाधव क्रीडाशिक्षक , शहर वाहतुक शाखा , विश्वास पाटील क्रीडाशिक्षक , धिरज नाईकवाडे , योगेश आदमे , प्रकाश पंडित , महेंद्र धबाले यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-