नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न – पत्रकार लक्ष्मीकांत मुळे

लोणी बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबाला नामाच्या वतीने धनादेशाचे वाटप.

अर्धापूर ( शेख जुबेर ) नाम फाउंडेशनचा माध्यमातून विविध प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात टोकाच्या निर्णय न घेता समस्यांना धैर्याने तोंड द्यावे.सामाजिक संघटना,प्रशासनाची मदत घेवुन शेतकऱ्यांनी समश्यांची सोडवणूक करावी असे आवाहन नामचे तालुका समन्वयक लक्ष्मीकांत मुळें यांनी गूरूवारी (ता २४) केले.
तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना धनादेशाचे वाटप नामच्या वतीने ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌करण्यात आले आहे.अर्धापूर तालुक्यातील सात शेतकरी कुटुंबातील वारसांना धनादेशाचे देण्यात आले आहे.लोणी बूद्रुक येथील सुर्यकांत भुस्से यांनी कर्जबाजारी नापिकीमुळे आत्महत्या केली होती.त्यांचे वारस चंद्रकला सुर्यकांत भुस्से यांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गंगाधर बक्केवाड, बाजार समिती संचालक संजय लोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, माजी सरपंच चंद्रमुणी लोणे, पत्रकार संघाचे सचिव गूणवंत विरकर, आदी उपस्थित होते. यावेळी नामाच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांची माहिती तालुका समन्वयक लक्ष्मीकांत मुळें यांनी दिली.आत्महात्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील वारसांना काही अडचणी आल्यास पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन गूणवंत विरकर यांनी केले तर नामच्या मदतीने शेतकरी कुटुंबातील वारसांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे अशा भावना कैलास भुस्से यांनी व्यक्त केल्या.