भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणं आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास लढा तिव्र करण्याचा निर्धार..

अर्धापूर ( ( शेख जुबेर ) आण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या वतीने विविध मागण्यासाठी अॅगस्ट क्रांतीदिनी जिल्ह्यधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या नांवे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.नांदेडचे महसूल आयुक्तालय सुरू करणे , जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार मदत देण्यात यावी, मराठवाडा विकास महामंडळाला निधी उपलब्ध करून कामे सुरू करणे, नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील तपासणी उपकरणे चालू करणे, माहिती अधिकार कायदा कलम चार अंतर्गत कलम एक ते १७ ची अंमलबजावणी करणे, माहिती व सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करुन या बाबत दर्शनी भागावर लावणे, नागरिकांची सनद प्रत्येक कार्यालयात लावणे, आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी न्यासाचे राज्य उपाध्यक्ष डॉ बालाजी कोंपलवार नांदेड जिल्हा अध्यक्ष अॅड धोंडीबा पवार जिल्हा सचिव भागावत पपुलवाड दत्ता तूमेवाड सोपान मारकड इंजिनिअर चंद्रशेखर अय्यर, अशोक पांपटवार, लक्ष्मीकांत मुळें गूणवंत विरकर, गोविंद कोत्तावार, श्रीनिवास शिंदे, इंजिनिअर काळुराम यादव इंजिनिअर विठ्ठल बोराळकर,पी
एस हाताळले आदी उपस्थित होते.यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ बालाजी कोंपलवार यांनी मार्गदर्शन केले.नांदेड तेथे मंजूर करण्यात आलेले विभागीय महसूल आयुक्तालय सुरू करणे, हेक्टरी पन्नास हजारांची तातडीने मदत करण्यासाठी व इतर जनहिताच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती दिली.